आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे एसीबीसमोर हजर झाला असून या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांचीही पोलिस खात्यासह एसीबीकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
बीड मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले होते. भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत झाली. या मतदारसंघातील काही मतदान केंद्रे बळकावण्यात आली आणि तिथे मनमानी मतदान करवून घेण्यात आले, अशा तक्रारी आहेत. ...
बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडेच्या घराची झडती घेतली असता १ कोटी ८ लाखांची रोकड, एक किलाे सोने, साडे पाच किलो चांदी असे घबाड सापडले. ...