बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
Beed Crime News: डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. ...
रणजित कासले हा सायबर पोलिस ठाण्यात असताना विनापरवानगी आरोपीला घेऊन गुजरातमध्ये गेला होता. तेथे पैसे घेतल्याचा आरोपाची चौकशीकरून पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले ...
बीड जिल्ह्यात आरोपीने दोन वर्षे महिलेने बलात्कार केला, नकार दिल्यानंतर व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर केले त्यामुळे पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला ...