बीड हा मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. बीड हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा असून, तो शिवकालीन आणि निजामशाहीच्या इतिहासाशी संबंधित आहे. तसेच जिल्ह्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात राजकीय वर्चस्वातून गुन्हेगारी वाढत आहे. यासोबतच सामाजिक तेढ, आर्थिक फसवणूक, महिला व बालकांवरील गुन्हे, मटका आणि बेकायदेशीर व्यापार, राख, वाळूची अवैध वाहतूक, भू माफिया वाढले असून यातून हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि पोलिस प्रशासन या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. Read More
Minister Yogesh Kadam Meet Santosh Deshmukh Family In Beed: संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी आग्रही असल्याचे योगेश कदम यांनी म्हटले आहे. ...