हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
उद्धव ठाकरे यांच्यावरती शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पडल्यावर तर त्यांचे दौरे महाराष्ट्रभर होत असत. अशा दौऱ्यानंतर काही वेळेस बाळासाहेब ठाकरे मला भेटले की, त्यांना मी एखादे निवेदन वा पुस्तक द्यायचे, कामाची माहिती सांगायचे त्यावेळेस ते अगदी ...
‘आपली पोरं जिंकली’ म्हणून त्यांनी जल्लोषच केला असता. व्यंगचित्रकार असल्याने राजकीय - सामाजिक अभ्यास तर आपसूकच होता. आपल्या मतावर ठाम, एखादा विचार मांडल्यावर त्यावर ठाम-कायम राहणारे नेते म्हणजे बाळासाहेब. ...
प्रबोधनकारांच्या जीवनगाथेचे प्रकाशन महापौर या नात्याने सुधीर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या समारंभात शिवसैनिक पहिला हार बाळासाहेबांना घालू लागले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना थांबविले आणि म्हणाले, ‘पहिला मान महापौरांचा. ...
बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख नाहीत, तर महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवसुद्धा. राजकारणातील अनेक टप्पे त्यांनी पाहिले, पण, त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले नाही. ...
महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तित्त्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कधीही विसरू शकत नाही. बाळासाहेब एक स्टेट्समन होते. तसेच ते अतिशय विशाल हृदयी नेते होते. ...