बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या धर्मराज कश्यपने तो १७ वर्षांचा असल्याचा दावा न्यायालयासमोर केला होता. तसा युक्तिवादही त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, गुन्हे शाखेने आधार कार्डवर त्याचे वय २१ असल्याचे सांगून न्यायालयात आधारकार्ड सादर केले. ...
२००३ मध्ये विकासक विनय मंदानी आणि कल्पना शहा यांच्याशी सिद्दिकी यांनी भागीदारीत व्हर्टिकल डेव्हलपर्स या नावाने कंपनी सुरू केली होती. मात्र, एकाच वर्षात त्यांनी स्वतःच्या पत्नीशी भागीदारी करत झीअर्स डेव्हलपर्स नावाने एक गृहनिर्माण कंपनी सुरू केली. ...