अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने कणखर व्यक्तिमत्त्व आणि कवितेचा अंतर्वाद जपणारा, राजकारणातील भीष्माचार्य राष्ट्रनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. ...
Atal Bihari Vajpayee Speech : पाकिस्तानसंदर्भात त्यांनी केलेली कविता विशेष गाजल्यानं आजही लोकांच्या विस्मृतीत गेलेली नाही. या कवितेतून त्यांनी पाकिस्तानचाच चेहरा उघडा पाडण्याबरोबरच जगासमोर पाकची पोलखोल केली होती. ...
२ सप्टेंबर १९८३ रोजी झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला उपस्थित असलेल्या गर्दीचा उच्चांक आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेते मंडळींनी गाठलेला नाही. ...
आपल्या भाषणामध्ये वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीरांचे वर्णन एका अनोख्याप्रकारे केले होते. सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय? हे केवळ 'त' या शब्दांचा वापर करुन सांगितले होते. ...
1977 साली भारतातील आणीबाणी संपल्यावर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळत होते. सरकार स्थापन झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांना संयुक्त राष्ट्राच्या आ ...