अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
Asian Games 2018 : नीरजने हे सुवर्णपदक भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी समर्पित केले आहे. सुवर्णपदक पटकावल्यावर आपली प्रतिक्रीया देताना नीरजने आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे देशातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेते होते. राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेमासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. पराभवामुळे ते व्यथित झाले नाही, लढत राहिले. २१ व्या शतकात भारताला जगातील एक शक्तिशाली राष्ट्र ...
‘अमर रहे, अमर रहे, अटलजी अमर रहे...’च्या घोषामध्ये माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे शनिवारी सकाळी पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे यावेळी नदीपर्यंत चालत ...