अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ...
भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश होतो. कारण त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्वच तसे होते. त्यांचा राजकीय प्रवास आदर्शवत आहे. ...
तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर संसदेत भाषण करताना एक पाऊल पुढे टाकून त्यांनी इंदिराजींना दुर्गा संबोधले होते. ...
अटलजी पत्रकारांसोबत तासन्तास बोलत बसायचे. ते खाण्याचे मोठे शौकीन होते. भाजपचे अनेक नेते त्यांचे मन जिंकण्यासाठी आपल्या भागातून त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ आणत असत. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारे ते मोठ्या मनाचे व्यक्ती होते. ...
तीन दशकांच्या संघर्षानंतरही भाजपा आणि तत्कालीन जनसंघाला संसदीय राजकारणात म्हणावा तसा विजय नोंदविता आला नव्हता. भरीसभर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या संबंधामुळे राजकीय अस्पृश्यतेचेही चटके पक्षाला बसत होते. ...
मुंबईत १९८६ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये (आताची राजे शिवाजी स्कूल) भरले होते. प्रख्यात कादंबरीकार विश्राम बेडेकर संमेलनाध्यक्ष होते. ...
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील तितकेच प्रभावी होते. आयुष्यभर सर्वसामान्यत्व जपलेला हा मनुष्य ‘साधे जीवन, उच्च विचार’ या उक्तीप्रमाणेच जगला. ...
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला आहे. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतीय राजकारणाची गुणवत्ता वाढवली. सरकार चालविण्याची जी प्रक्रिया आहे तिला उद्देशपूर्ण केले. त्यांनी भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्यायच उत्पन्न होणार ...