अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
भारतीय राजकारणातील अजातशत्रू नेते, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न किताबाने गौरविण्यात आलेले भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव शुक्रवारी सायंकाळी यमुना तीरावर पंचत्वात विलीन झाले. ...
अटलजी व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. ...
जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती. ...
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, वाजपेयी यांच्या निधनाबाबत भाजपाचे नगरसेवक असंवेदनशील दिसून आले. ...
उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ वर्षापूर्वी आंब्याचे रोपटे लावले होते. ते आता बहरले असून या झाडाला त्यांचे नाव देण्यात आल्याने ते अटलजींच्या पश्चात कायम स्मरणात राहणार आहे. ...
माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर शासनाने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला असताना जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील नागरिकांनीही आपले दैनंदिन कामकाज, व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ...