अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेल्या तीन कलशांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. पक्षासाठी आदर्श असलेल्या नेत्याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना उपराजधानीतील कार्यकर्ते गहिवरले होते. हा आमच्यासाठी प्रेरणाकलशच असल्याची भावना याव ...
भाजपचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाला. आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात तो ठेवण्यात आला आहे. दर्शनासाठी येथे गर्दी झाली आहे. ...
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यो ‘अस्थीकलश यात्रा’ देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये काढून त्या अस्थींचे सर्व नद्यांमध्ये विसर्जन करण्याचे भारतीय जनता पार्टीने ठरविले आहे. ...