आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारला तो पाळावा लागेल. परंतु अनधिकृत भोंग्यावर कारवाई करण्याचे ताकद भाजपा नेते योगींच्या रुपाने देशाने पाहिला असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे. ...
राज्यात भोंग्यांबाबत शिवसेनेकडून बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भोंगे उतरवण्याचे क्लासेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घ्यावेत, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. ...
Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी घेतलेल्या बहुतांश भूमिका आमच्याही राहिलेल्या आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-मनसे युतीवर भाष्य केले आहे. ...
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीच्या दोन वर्षे आधीच राष्ट्रवादीसोबत युतीची अंतिम बोलणी झाली होती, असा मोठा खुलासा भाजप नेत्याने केला आहे. ...