Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi wari, Latest Marathi News
आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
- नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!''माउली माउली'' नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात गुरुवारी माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. ...
- सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारे पहिला अश्व रिंगण सोहळा पार पडला. ...
कुल दैवत श्री खंडेरायाच्या दशर्नाने कृत कृत्य झालेल्या वारकर्यांरनी जेजूरी नगरीचा निरोप घेऊन आद्य रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीकडे सकाळी ७ वा. प्रस्थान ठेवले. ...
उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून २२३६० क्युसेव क्यूसेक इतका तर उजनीतून ४१६०० क्युसेकचा विसर्ग सोडल्याने पंढरपुरात ६३ हजार ९६० इतका विसर्ग झाला आहे. त्यामुळे पंढरपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ...