आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
शहरातील माळीवेस भागातील हनुमान मंदिरात मुक्कामानंतर संत मुक्ताबाई पालखीचे रविवारी शहरातील पारंपरिक मार्गाने प्रस्थान झाले. त्यानंतर पेठ बीड भागात स्वागत करण्यात आले. ...
संतश्री मुक्ताबार्इंच्या पालखीचे शनिवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीमार्गावर उभा रिंगण सोहळा पाहण्याचा अपूर्व आनंद बीडकरांनी घेतला. ...
पुण्यातील निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात सकाळी विश्वस्तांच्या हस्ते तुकाराम महाराजाच्या पादुकांची पुजा झाली .त्यानंतर पालखीला भावपूर्ण निरोप देण्यात आला ...
परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे आर्ट आॅफ लिव्हिंग स्थापित ज्ञान मंदिर आश्रम परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची ५१ फूट मूर्ती तयार करण्यात येत आहे. ...