आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
चांदवड : येथील गुजराथी गल्लीतील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले नियम पाळत आषाढी एकादशीचे कार्यक्रम साजरे झाले. ...
येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त शहरातील शिंपी गल्ली कॉर्नर येथे विठ्ठल व नामदेवांच्या प्रतिमेचे पूजन सोमनाथ हाबडे यांच्या हस्ते करण्यात आले. अमोल लचके यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली. ...
लासलगाव : येथील पुरातन श्रीराम मंदिर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींला महाअभिषेक करण्यात आला. महापूजेचे डॉ. अविनाश पाटील व डॉ. सुश्मिता पाटील हे मानकरी होते. ...
लासलगाव : येथे सुरू असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संतसेना महाराज मंदिरात मंगळवारी (दि. २०) आषाढी एकादशीनिमित्त लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व लासलगाव श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक होळकर यांनी भेट देऊन पाहणी ...
लासलगाव : ब्राह्मणगाव (विंचूर) येथे आषाढी एकादशीनिमित्त कोरोनाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करून प्रतीकात्मक पद्धतीने पायी दिंडी सोहळा पार पडला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गिर्यारोहक टीमने नाशिक, पालघर व ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या दुर्गम खैरेवाडी येथे दोन किमी पायपीट करत येथील महिलांना साडी-चोळी व आषाढी एकादशीचा फराळ दिला. गोरगरीब जनतेतच खरा पांडुरंग शोधायचा असतो, हाच संदेश या ...