Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती. Read More
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांची मुदत सहा वर्षांची असून, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात जेटली यांना पदाची शपथ दिली गेली. जेटली उत्तर प्रदेशातून गेल्या महिन्यात निवडून गेले. ...
मूत्रपिंडाच्या आजारामुळे शुक्रवारी अखिल भारतीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे सोमवारी डायलेसिस करण्यात आले. ...
अर्थमंत्री अरुण जेटली मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील महिन्यातील लंडनचा दौरा रद्द करण्यात आला आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेच्या नेतेपदी निवड झालेले अरुण जेटली यांच्यावर लवकरच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने दिले आहे. ...
३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षात प्रत्यक्ष करांची वसुली १८ टक्क्यांनी वाढून १0.0२ लाख कोटी रुपयांवर गेल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली म्हणाले की, नोटांबदी आणि जीएसटी यांच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ...
राज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुम ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे. ...