१९४९ पासून ७ डिसेंबर यादिवशी देशात सशस्त्र सेना ध्वज दिन केला जातो. देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग दिले जातात. फ्लॅगचे हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत. Read More
कोरोनाच्या प्रभावामुळे सर्वत्र निर्बंध असतानाही जिल्ह्याच्या ध्वजनिधी संकलनास नाशिककरांनी भरघोस योगदान दिले. जिल्ह्याला शासनाकडून ध्वजदिन निधी संकलनासाठी १ कोटी २९ लाख ४८ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले ...
वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’मार्फत हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
एरवी चित्रपटामध्ये पहायला मिळणाऱ्या मशिन गन्स, रॉकेट लॉंचर प्रत्यक्ष पहायला मिळाल्याने कोल्हापुरातील १00 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी अचंबित झाले. निमित्त होते खासदार संभाजीराजे यांनी आयोजित केलेल्या सशस्त्र सेना ध्वज निधी दिनाचे. ...