राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मृद संधारण व जल संधारण करण्यासाठी व स्थानिक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट न होऊ देण्यासाठी राज्यामध्ये बायोडायव्हर्सीटी पार्कची चळवळ सरकार पुढे नेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
महाराष्ट्राला जवळपास ७२० किलोमिटरचा समुद्र किनारा लाभाला असून, महाराष्ट्रात अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये मत्स्यबीज सोडून त्यातूनही मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, अशी मागणी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. ...
अर्जुन खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांचं माझ्यावर इश्क असं म्हटले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. ...
मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला. ...
दुष्काळात पाणी आणण्यासाठी शिवसेनेने जसे चांगले प्रयत्न केले, त्यामुळे तर आम्ही समाधानी झालो आहोतच, परंतु आता आमच्या शाळेत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण करा अशी आर्त हाक दहीफळ-काळे येथील विद्यार्थिंनीनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना घातली. ...