एप्रिल फूल्स दिन हा अनेक देशांमध्ये एप्रिल १ला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढ्ल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो. एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली असे म्हटले जाते. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ यांनी प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली. Read More
Volkswagen April fool news: Volkswagen कंपनीने अधिकृत मेल आयडीवरून मीडियाला एक मेल पाठविला. यामध्ये कंपनीचे नाव बदलणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या एप्रिल फूल न्यूजमुळे कंपनीचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले होते. ...
April Fools Day 2021 : एखाद्याला मुर्ख बनवले की ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ म्हणत समोरच्याला चिडवले जाते. मात्र हा दिवस आला कुठून याचीही वेगळी गोष्ट आहे. ...
नाशिक : १ एप्रिल म्हणजेच जणू जागतिक फसवणूक दिनच! या दिवशी खोटे मॅसेज टाकून फसवून गंमत केली जात असली तरी सध्या कोरोनामुळे देशभरात गांभिर्य आहे. त्यामुळे एप्रिल फुल कराल तर लॉकअपमध्ये जाल असा संदेश पोलीसांनी देताच नाशिकमधील बहुतांशी सोशल मिडीयावर त्याब ...
सध्या संपूर्ण देश ‘कोरोना’शी संघर्ष करत आहे. या स्थितीत ‘एप्रिल फूल’ करणे हे अयोग्य होईल. जर कुणी अशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. ...
१ एप्रिल रोजी अनेक जण मित्र, नातेवाईकांना काही तरी खोटे सांगून एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे मेसेज सोशल मीडियावर टाकू नयेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा ...