एप्रिल फूलच्या दिवशी लेकीने केली जीवघेणी मस्करी; ढसाढसा रडली आई, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 01:32 PM2024-04-03T13:32:13+5:302024-04-03T13:38:40+5:30

एप्रिल फूलच्या दिवशी एका महिलेला एक विचित्र अनुभव आला आहे.

daughter faked her own death to prank mother made her traumatized | एप्रिल फूलच्या दिवशी लेकीने केली जीवघेणी मस्करी; ढसाढसा रडली आई, म्हणाली...

एप्रिल फूलच्या दिवशी लेकीने केली जीवघेणी मस्करी; ढसाढसा रडली आई, म्हणाली...

एप्रिल फूलच्या दिवशी एका महिलेला एक विचित्र अनुभव आला आहे. आपली 21 वर्षीय मुलगी सूसन हिला रुग्णालयात पाहण्यासाठी जात असलेल्या एका महिलेला फोन आला ज्यामुळे तिचं आयुष्य काही वेळासाठी का होईना उद्ध्वस्त झालं होतं. मुलीच्या रुममेटने रडत रडत महिलेला फोन केला आणि तिला सांगितलं की, सूसनची तब्येत अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. महिलेने फोन ठेवला आणि ती ढसाढसा रडू लागली. पण सत्य काही वेगळेच होतं. 

Reddit वर एका पोस्टच्या मदतीने महिलेने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच महिलेला मोठा धक्का बसला होता. ती रडत बसली होती. तितक्यातच तिची मुलगी तिच्या रूममेटसह घरी आली आहे आणि 'एप्रिल फूल' ओरडत मोठ्याने हसत राहिली. म्हणजे तिच्या मृत्यूची बातमी ही खोटी होती. 

मुलीची तब्येत बरी होती आणि तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण मुलीला आईला सरप्राईझ द्यायचं होतं म्हणून तिने अशी मस्करी केली. महिलेने सांगितलं की, "हा प्रँक असल्याचा खुलासा झाल्यावर मला जेवढा दिलासा मिळाला होता, तेवढाच मला रागही आला होता. मी तिच्यावर अत्यंत वाईट पद्धतीने ओरडले आणि त्याला पुन्हा माझ्या घरी येऊ नकोस असे सांगितलं."

"मी लगेच मुलीकडून घराच्या चाव्या काढून घेतल्या. माझी मुलगी मला समजावून सांगू लागली आणि माझा राग पाहून शेवटी तिलाच अश्रू अनावर झाले. पण मी तिला अजिबात माफ करणार नाही. या चुकीसाठी मुलीला माफ करणं माझ्यासाठी कठीण आहे. मी तिच्याशी कधीच बोलणार नाही असं नाही, पण आता मी खूप दुखावले आहे आणि रागावले आहे. मुलगी मला रोज फोन करून शांत करण्याचा प्रयत्न करते पण मी तिचा फोन उचलत नाही."
 

Web Title: daughter faked her own death to prank mother made her traumatized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.