आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
आज १५ ऑगस्ट रोजी, देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी, तुम्ही तुमच्या कुटुंबासह घरी बसून हिंदी सिनेइंडस्ट्रीने बनवलेल्या या सर्वोत्तम देशभक्तीपर चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. ...