अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. Read More