एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
Air India Plane Pune: दिल्लीहून पुण्याला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच पक्षी धडकला. त्यामुळे विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. ...
एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'एअर इंडियाची दुबई ते चेन्नई AI906, दिल्ली ते मेलबर्न AI308 आणि मेलबर्न ते दिल्ली AI309 ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.' ...
air india crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील ढिगाऱ्यातून ७० तोळे सोने आणि ८० हजार रुपये रोख सापडले. या मौल्यवान वस्तूंवर कोणाचा अधिकार असेल? कायदा काय म्हणतो? ...