कष्टमुक्ती योजनेअंतर्गत उच्च शिक्षणात वाल्मिकी मेहतर समाजासाठी दोन जागा राखीव असाव्यात. त्यांना कालबद्धतेने घरे मिळावीत. शासकीय नियम व निकषांवर सफाई कामगारांची संख्या असावी, अशी मागणी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी केली आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांसाठी प्रलंबित असलेल्या जूनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर शिक्षक आक्रमक झाले असून चार शिक्षक आमदारांच्या नेतृत्वाखाली वंचित शिक्षकांनी सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढून नागपूर विधानभवनावर धडकली. ...
नागरिकता सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे धोरण राबवून देशाचे विभाजन करीत आहेत. या विधेयकाचा विरोध करणाऱ्या दिल्लीतील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष माराहाणीचा काँग्रेस आंदोलनाद्वारे निषेध करीत आहे. ...
नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे सोमवारी मर्कज मशीद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. ...