माध्यमेही हा रोड शो कव्हर करत होते. यावेळी कॅमेऱ्यांवरही दगडफेक झाली. दगडफेक सुरू झाल्यानंतर, अरविंद केजरीवाल लगेचच आपल्या गाडीत बसले. यानंतर त्यांना कडेकटो सुरक्षितता मिळाल्यानंतर, पुन्हा एकदा रोड शोला सुरुवात झाली. ...
२२ वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. येथे विजयाची हॅट्रिक मारणारे आमदार गोविंदभाई पटेल यांचे तिकीट कापत रमेश टिलाला या बड्या उद्योगपतीला पुढे केले. यावेळी काँग्रेसने माजी जिल्हाध्यक्ष हितेश वोरा यांना ‘हात’ दिला आहे. ...
जैन यांच्या तुरुंगातील आरामदायी जीवनाबद्दल भाजपने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बलात्काऱ्याकडून मसाज केल्यानंतर जैन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ...
जैन हे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असून, ते तुरुंगात फिजिओथेरपी घेत होते, असा दावा आम आदमी पक्षातर्फे करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी नवा खुलासा पुढे आला आहे. ...
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत कथित स्टिंग व्हिडीओ प्रसारित करून आप व या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारात खोलवर गुंतले असल्याचा आरोप केला. ...