वाढदिवसाच्या पार्टीत तरुणांची पोलिसाला मारहाण; कसारामधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 11:56 IST2022-04-09T11:50:38+5:302022-04-09T11:56:58+5:30

कसारा : हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत गोंधळ घालून आरडाओरड करणाऱ्या तरुणांना शांत राहण्यास सांगितल्याने तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना ...

Youths beat up police at birthday party; Shocking incident in Kasara | वाढदिवसाच्या पार्टीत तरुणांची पोलिसाला मारहाण; कसारामधील धक्कादायक घटना

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणांची पोलिसाला मारहाण; कसारामधील धक्कादायक घटना

कसारा : हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत गोंधळ घालून आरडाओरड करणाऱ्या तरुणांना शांत राहण्यास सांगितल्याने तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना शहापूर तालुक्यातील खर्डीजवळ मुंबई-नाशिक महार्गावरील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

खर्डी आउट पोस्टवर दिलीप राठोड हे पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री ते हॉटेल ट्युलिपमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथे रात्री १० वाजता काही मित्र एकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांचा तेथे प्रचंड गाेंधळ सुरू हाेता. हाॅटेलमालकाने त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यानंतरही त्यांनी धिंगाणा सुरूच ठेवला. त्याचा इतर ग्राहकांना त्रास होत असल्याने पोलीस कर्मचारी राठोड यांना हाॅटेलमालकाने या तरुणांना शांत करण्यासाठी सांगितले.

त्यानंतर राठोड यांनी या तरुणांना शांतपणे वाढदिवस साजरा करा, असे सांगताच तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमुळे हॉटेलमध्ये आणखीच गोंधळ उडाला. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करतानाची घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची नावे देण्यास नकार दिला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात येत आहे.

Web Title: Youths beat up police at birthday party; Shocking incident in Kasara