चेणे नदीत बुडून तरुणाचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 21:33 IST2019-07-07T21:33:34+5:302019-07-07T21:33:47+5:30

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला

The youth dies after being drowned in the river Cheena | चेणे नदीत बुडून तरुणाचा मृत्यू  

चेणे नदीत बुडून तरुणाचा मृत्यू  

मीरारोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे नदीत बुडून राहुल राजभर (24) रा . भारवाड चाळ, दहिसर पूर्व या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला.

रविवार सुट्टी असल्याने राहुल हा आपल्या 5 मित्रांसह चेणे नदी परिसरात पार्टी करण्यासाठी आले होते. दारूची पार्टी करून ते नशेत होते. राजभर हा नदीत उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला.  सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी मीरारोड अग्निशमन दलास चेणे नदीत तरुण बुडल्याचा कॉल येताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. 

त्याचा मृतदेह शोधण्यास घेतला असता पावणे सातच्या सुमारास सापडला. काशिमीरा पोलीसांनी  मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन साठी पाठवला आहे. तर मद्यपी मित्रांची चौकशी पोलीस करत आहेत. 

या आधी पार्टी साठी चेणे नदी जवळ तिघांना अग्निशमन दलाने वाचवले होते. चेणे नदी परिसरात उघड्यावर सर्रास मद्यपान व पार्ट्या झोडायला  लोकं येत असतात. नदीत बुडून दरवर्षी लोकं मरण पावत असतात. पोलीसांनी मनाई केली असली तरी पोलीसांची गस्त नसल्याने मद्यपींचा सर्रास राबता असतो.

Web Title: The youth dies after being drowned in the river Cheena