भिवंडीत भाजपाचे पोस्टर जाळुन युवक काँग्रेसची निदर्शने

By नितीन पंडित | Updated: October 5, 2023 20:15 IST2023-10-05T20:11:09+5:302023-10-05T20:15:08+5:30

भाजपा सोशल मीडियाचे पोस्टर, टायर जाळून निषेध

Youth Congress protests by burning BJP posters in Bhiwandi | भिवंडीत भाजपाचे पोस्टर जाळुन युवक काँग्रेसची निदर्शने

भिवंडीत भाजपाचे पोस्टर जाळुन युवक काँग्रेसची निदर्शने

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भाजपाच्या सोशल मीडिया पोर्टलवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो विद्रुपीकरण करून रावणाच्या रूपात दाखवण्यात आले. या घटनेचा निषेध करण्यासाठी भिवंडीत युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपा सोशल मीडियाचे पोस्टर व टायर जाळुन आपला निषेध नोंदवला आहे.

युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी रेहाना अन्सारी, इकबाल सिद्दीकी, दिनेश प्रजापती, साई चीलका, पियूष पटेल, आलम शेख यांसह अनेक युवक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Youth Congress protests by burning BJP posters in Bhiwandi

टॅग्स :BJPभाजपा