डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 02:22 PM2017-12-18T14:22:09+5:302017-12-18T14:24:24+5:30

युवक काँग्रेस आणि महिला आघाडीतर्फे नागरिकांना पेढे आणि गाजर वाटप करण्यात आले.

Youth Congress protest against BJP | डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप

डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप

googlenewsNext

डोंबिवली - युवक काँग्रेस आणि महिला आघाडीतर्फे नागरिकांना पेढे आणि गाजर वाटप करण्यात आले. गुजरात निवडणुकीत भाजपाला काँग्रेसनं कांटे की टक्कर दिली आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व पुढे आले म्हणून नागरिकांना पेढे वाटण्यात आले.  तसंच कल्याण डोंबिवली 22 वर्षे सत्तेमध्ये असलेल्या भाजपा-शिवसेनेनं काहीच केले नाही फक्त आश्वासन दिले म्हणून गाजर वाटण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 'तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ' हे अशी घोषणाबाजीही करण्यात आली. 

पेढे व गाजर वाटपाचा हा कार्यक्रम युवक काँग्रेस सचिव अमित म्हात्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका रत्नप्रभा म्हात्रे, वर्षा गुजर, दीप्ती दोशी, अंजली नाईक, तृप्ती सरफरे, सुजाता परब, निखिल भोईर, अशोक कापडणे, शिबू रामचंद्रन, गौरव माळी, सुधीर सुर्वे, युवक व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

दरम्यान,  केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यावर  सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने 100 हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. सध्या भाजपाने एकूण 88 जागांवर विजय मिळवला आहे. तर 12 ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसने 66 जागा जिंकल्या असून, 14 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.  

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाची सुरुवातीची आघाडी मोडीत काढत काँग्रेसने मुसंडी मारल्याने राज्यात मोठा उलटफेर होण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र जसजसे कल स्पष्ट होऊ लागले तशी भाजपाची आघाडी वाढत गेली. 

Web Title: Youth Congress protest against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.