अल्पवयीन मुलीवर लहान भावानेच केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:24 IST2020-10-09T00:24:38+5:302020-10-09T00:24:43+5:30
१५ वर्षांची पीडित मुलगी आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होती. तिचा लहान भाऊ आजीकडे राहतो. एप्रिल महिन्यात मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता सोनोग्राफीमध्ये मुलगी गरोदर असल्याचे समजले.

अल्पवयीन मुलीवर लहान भावानेच केला अत्याचार
उल्हासनगर : शहराच्या पश्चिम भागात सख्ख्या भावाच्या अत्याचारांतून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन बहिणीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. मुलीच्या आईने ६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार लहान मुलावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली.
१५ वर्षांची पीडित मुलगी आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होती. तिचा लहान भाऊ आजीकडे राहतो. एप्रिल महिन्यात मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता सोनोग्राफीमध्ये मुलगी गरोदर असल्याचे समजले. त्यांनी मुलीला विश्वासात घेतले असता, लहान भावाने जबरदस्तीने केल्याची माहिती तिने दिली. कुटुंबाची मानहानी होईल, या भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार न करता स्थानिक डॉक्टरांकडे उपचार सुरू ठेवले. २९ सप्टेंबर रोजी स्थानिक दवाखान्यात तिने बाळाला जन्म दिला. मात्र, नाळ अडकल्याने उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविले. तिथे मुलीची तब्येत बिघडल्याने १ आॅक्टोबर रोजी जे.जे. रुग्णालयात हलविले. तिथे २ आॅक्टोबर रोजी मुलीचा मृत्यू झाला. याप्रकाराची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला असता, मुलीच्या आईने तक्रार दाखल केली.