सेल्फी काढताना ओव्हरहेड वायरचा झटका लागून तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 13:51 IST2018-06-18T13:51:26+5:302018-06-18T13:51:26+5:30
मालगाडीवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आल्याची घटना ठाकुर्ली-पत्रीपुल दरम्यान घडली.

सेल्फी काढताना ओव्हरहेड वायरचा झटका लागून तरुण गंभीर जखमी
कल्याण - मालगाडीवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह एका तरुणाच्या अंगलट आल्याची घटना ठाकुर्ली-पत्रीपुल दरम्यान घडली. फोटो काढत असताना कॅमेऱ्याचा फ्लॅश पडल्याने मालगाडीवर असलेल्या ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका लागून सदर तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो डोंबिवली परिसरातील ठाकूरवाडी येथे राहणार असून , सोलापूर येथील मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे, अशी माहिती आरपीएफ कडून देण्यात आली.