A young man is pushed by a staff member on a traffic police towing van | वाहतूक पोलिसांच्या टोर्इंग व्हॅनवरील कर्मचाऱ्याची तरूणाला धक्काबुक्की

पोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

ठळक मुद्देपोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश झटापटीमध्ये मार लागल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर पोलिसांच्या कंत्राटी टोर्इंग व्हॅनवरील एका कर्मचाºयाने नो पार्र्किं गमधील महेंद्र माने या दुचाकी चालकाशी हुज्जत घालून त्याला धक्काबुक्की केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उथळसर भागात घडली. याप्रकरणी राबोडी वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील रहिवाशी माने हे एका अन्न पदार्थ घरपोच करणाºया कंपनीत नोकरीला आहेत. शुक्र वारी दुपारी त्यांनी उथळसर येथील एका उपहारगृहाच्या समोर त्यांची दुचाकी उभी केली. त्यानंतर ते उपहारगृहात अन्न पदार्थ घेण्यासाठी गेले. त्याचदरम्यान, वाहतूक नियंत्रण शाखेची टोर्इंग व्हॅन त्याठिकाणी आली. नो पार्र्किं ग मध्ये असलेली माने यांची दुचाकी टोर्इंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी उचलून व्हॅनवर ठेवत असतांनाच तिथे ते पोहचले. त्यांनी या कारवाईला विरोध करीत त्यांची दुचाकी खाली खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोर्इंग व्हॅनवरील एका कर्मचाºयाने त्यांच्यासोबत झटापट केली. यात त्यांच्या हाताला मार लागला. हा प्रकार घडला तेव्हा वाहतूक पोलिसांचा एक कर्मचारीही व्हॅनमध्ये होता. त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला नाही. एखाद्या वाहनावर कारवाई करण्यापूर्वी व्हॅनमधील वाहतूक पोलिसाने उद्घोषणा करणे अपेक्षित असते. मात्र, या वाहतूक पोलिसांकडून अशी कोणतीही उद्घोषणा झाली नसल्याचा आरोपही माने यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघांचीही एकमेकांविरुद्ध तक्रार असल्यामुळे माने यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. मात्र, संबंधित तरुणाला कोणतीही मारहाण झाली नसून त्याने गाडी खेचतांना त्याला मार लागल्याचा दावा या व्हॅनवरील टोर्इंग कर्मचाºयाने केला आहे.
 

‘‘ नेमकी काय घडले? याबाबतची चौकशी करण्याचे आदेश राबोडी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. यामध्ये दोषी आढळणाºयांवर कारवाई करण्यात येईल.’’

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर
 

‘‘ दुचाकी नो पार्र्किं गच्या ठिकाणावरुन उचलताना उद्घोषणाही टोर्इंग व्हॅनवरील पोलीस कर्मचाºयाने केली नव्हती. दुचाकी ठेवली टोर्इंगच्या व्हॅनवर ठेवली जात असतांनाच कारवाईला विरोध केला. मात्र व्हॅनवरील कर्मचाºयाने न जुमानता गाडी खेचण्याचा प्रयत्न केल्याने झटापटीतत माझ्या हाताला मार लागला.’’
महेंद्र माने, धक्काबुक्की झालेला तरूण

Web Title: A young man is pushed by a staff member on a traffic police towing van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.