पिकअप टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:26 IST2021-11-19T17:26:14+5:302021-11-19T17:26:20+5:30
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण ते बदलापूर मुख्य रस्त्यावरील नेवाळी नाक्यावर बुधवारी रात्री साडे दहा वाजता अमर कुमार पांडे उभा होता

पिकअप टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : नेवाळी गाव नाक्यावरील मुख्य रस्त्यावर बुधवारी रात्री साडे दहा वाजता भरधाव पिकअप टेम्पोच्या खाली चिरडून अमर कुमार पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालक भरत जाधव यांच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण ते बदलापूर मुख्य रस्त्यावरील नेवाळी नाक्यावर बुधवारी रात्री साडे दहा वाजता अमर कुमार पांडे उभा होता. यावेळी भरधाव आलेल्या पिकअप टेम्पोने पांडे याला चिरडल्याने, पांडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. उमाकांत पांडे यांच्या तक्रारीवरून टेम्पो चालक भरत जाधव यांच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस अधिक चौकशी करीत असून कल्याण ते बदलापूर मुख्य रस्त्यावर अपघातात वाढ झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत.