तळोजा रस्त्यावरील कार अपघातात तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 22:21 IST2021-12-08T22:20:40+5:302021-12-08T22:21:48+5:30
Accident News : दोन दिवसापूर्वी याच रस्त्यावर एका तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तळोजा रस्त्यावरील कार अपघातात तरुणाचा मृत्यू
सदानंद नाईक
उल्हासनगर - हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळोजा रस्तावर चिरडगाव येथे मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता नवनीत भवार यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी याच रस्त्यावर एका तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळोजा एमआयडीसी रस्ताने मुरबाड गावी जाण्यासाठी नवनीत भवार कारने निघाला होता. मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता रस्त्यातील चिरडगाव या ठिकाणी कारला अज्ञात वाहणारे जोरदार धडक दिल्याने, नवनीतचा जागीच मृत्यू झाला. हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. मृत नवनीत भवार यांच्या भाऊ देविदास भवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी डोंबिवली येथे राहणाऱ्या तरुणाचा अशाच प्रकारच्या कार अपघातात मृत्यू झाला. तर मित्र गंभीर जखमी झाला आहे.