लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोडवरील हावरे सिटी भागातील आदिवासी पाडा परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आकाश जाधव (२५, रा. आदिवासी पाडा, ठाणे) याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पातलीपाडा येथील निळकंठ वूडस् बिल्डींग भागात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आकाशचा मृतदेह २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. ही माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत त्याठिकाणी बचावकार्य केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. दरम्यान, हा मृतदेह चितळसर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तो पाठविला. त्याच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:03 IST
हावरे सिटी भागातील आदिवासी पाडा परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आकाश जाधव (२५, रा. आदिवासी पाडा, ठाणे) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. त्याने ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
ठळक मुद्दे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हावरे सिटीजवळील आदिवासी पाडयातील घटना