रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, ISRO मध्ये सायंटिस्ट पदासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:04 IST2021-05-02T23:47:29+5:302021-05-03T00:04:28+5:30

भारतात ओबीसीमध्ये सर्वप्रथम 

a young man from Badlapur, selected as a Junior Scientist for isro whose father is auto driver | रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, ISRO मध्ये सायंटिस्ट पदासाठी निवड

रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, ISRO मध्ये सायंटिस्ट पदासाठी निवड

ठळक मुद्देथोडं थांबा काहीतरी वेगळं करायचंय अस त्याने कुटुंबियांना सांगितले. आणि टाटा स्टीलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला.

बदलापूरबदलापूरातील एका रिक्षा चालकाच्या मुलाची इस्रोत ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. देवानंद सुरेश पाटील असे या तरुणाचे नाव आहे. देवानंदच्या या यशामुळे बदलापूरच्या लौकिकात भर पडली असून त्याबद्दल या तरुणावर व त्याच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देवानंद मेकॅनिकल इंजिनिअर असून सध्या टाटा स्टिल जमशेदपूर येथे इंजीनिअर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी देवानंदची रेल्वे लोको पायलट म्हणून निवड झाली होती.परंतु ही नोकरी त्याने नम्रपणे नाकारली.

थोडं थांबा काहीतरी वेगळं करायचंय अस त्याने कुटुंबियांना सांगितले. आणि टाटा स्टीलमध्ये नोकरी करतानाच तो वेगवेगळ्या परीक्षा देत राहिला. त्यापैकीच एक असलेल्या इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) परीक्षेत देवानंद देशात ओबीसी मध्ये पहिला आला असून त्याची जूनियर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. शुक्रवारी(ता.३०) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महिन्याभरात त्याची नियुक्ती कोणत्या ठिकाणी होणार हे स्पष्ट होणार असल्याचे देवानंदचे वडील सुरेश पाटील यांनी सांगितले. देवानंदची एक बहीण इंजिनियर म्हणून नोकरी करत आहे.तर दुसरी जळगाव शासकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. या तिन्ही मुलांनी दहावीपासूनच सुयश मिळवले आहे. देवानंदला दहावीला ९७.९ टक्के,मोठ्या बहिणीला ९४ टक्के गुण होते.तर धाकटी बहीण ९७.२० टक्के गुण मिळवून मुंबई बोर्डात तिसरी आली होती.

मुलाच्या यशाचा आनंद अवर्णनीय

सुरेश पाटील हे बदलापुरातील एक प्रामाणिक रिक्षा चालक असून दिवसरात्र १२-१४ तास रिक्षा चालवून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचे शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या पत्नीने दररोज ७-८ तास पापड तयार करण्याचे काम करून त्यांना साथ दिली.मुलांच्या या यशाने या कष्टाचे चीज झाले असून हा आंनद अवर्णनीय असल्याच्या भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केल्या.

Web Title: a young man from Badlapur, selected as a Junior Scientist for isro whose father is auto driver