शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन; अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 8:16 AM

 येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केडीएमसीने कंत्राट दिले असून त्या ठेकेदाराने दोन, तीन महिन्यापासून पगार थकवल्याने महापालिकेच्या डोंबिवलीतील कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.

डोंबिवली-  येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केडीएमसीने कंत्राट दिले असून त्या ठेकेदाराने दोन, तीन महिन्यापासून पगार थकवल्याने महापालिकेच्या डोंबिवलीतील कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील सकाळच्या सत्रातील कचरा न उचलला गेल्याने बहुतांशी ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत.

डोंबिवलीत व कल्याण मध्ये 200 कंत्राटी कामगार कार्यरत असून 120 ड्रायव्हर कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यापैकी डोंबिवलीत सुमारे 200 कामगार कार्यरत असतात, त्या सगळ्यानी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. त्यामुळे स्वछता अधिकाऱ्यांची दाणादाण उडाली असून पोलीस बलाचे साहाय्य घेऊन त्यांना कामावर हजर करण्याचा मानस असल्याची माहिती स्वच्छता अधिकारी विलास जोशी यांनी लोकमतला दिली. ते म्हणाले की, आधी आयुक्त, उपायुक्त आदींसोबत चर्चा सुरू असून त्यातून तोडगा निघतो का हे बघावे लागेल. तसे प्रयत्न सुरू आहेत. काही वाहनांची हवा काढण्यात आली असून समस्या वाढली आहे. ठेकेदार म्हणतो की दोन महिन्यांच पगार राहिला आहे. तर कामगार म्हणतात, तीन महिन्यांचा पगार राहिला आहे. त्यात नेमके कोणाचे बरोबर याचीही माहिती दोन दिवस झाले मिळवत आहोत, असेही सांगण्यात आले. 

कल्याणमध्ये मात्र अजून तरी या बंदच्या पवित्र्याचा परिणाम झालेला नसल्याचा दावा जोशी यांनी केला. डोंबिवलीत करचार्यांनी खंबाळपाडा येथे एकत्र येण्याचे आवाहन कंत्राटी कामगार संघटनेने केले आहे, या आंदोलनाला मनसे चा पाठींबा असल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, आयुक्त गोविंद बोडके यांनी कामगार आणि ठेकेदार यांना खडे बोल सुनावले, जर जनतेला वेठीस धरून आंदोलन होणार असेल तर मग कायद्याचा बडगा उगारावा लागेल अशी तंबी दिल्यानंतर तातडीने आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.या आंदोलन संदर्भात महापौर विनिता राणे म्हणाल्या की,  कामगारांचे पगार देणे ही ठेकेदारांची जबाबदारी आहे, त्यात पालिकेचा सबंध नाही. त्यामुळे जे आंदोलन झाले ते चुकीच्या पद्धतीने केले होते. पालिकेची कचरा वाहन गाड्या ही संपत्ती असून त्याची हवा काढणे हे संयुक्तिक नाही, आंदोलन का केले, कोणी केले त्यांना कोणत्या राजकीय पक्षाने सहकार्य केले. जनतेला वेठीला धरून संबंधित पक्ष देखील जनतेच्या नजतेतून उतरेल यात संदेह नाही, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका