मीरा भाईंदरच्या नाट्यगृहाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार; प्रताप सरनाईक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 PM2021-07-19T16:25:13+5:302021-07-19T16:30:02+5:30

नाट्यगृह इमारतवर सुमारे ८० कोटींहून अधिक खर्च झाला आहे.

Work on Mira Bhayander's theater will be completed by March; Information of Shivsena MLA Pratap Saranaik | मीरा भाईंदरच्या नाट्यगृहाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार; प्रताप सरनाईक यांची माहिती

मीरा भाईंदरच्या नाट्यगृहाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार; प्रताप सरनाईक यांची माहिती

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ शहरातील पहिल्या नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून हे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल. पालिकेचा पैसा खर्च होऊ न देता हे नाट्यगृह नागरिकांच्या सुविधेसाठी होत असल्याचे आमदार प्रताप सरनाईक हे कामाच्या आढाव्या प्रसंगी म्हणाले .  

मीरा भाईंदर शहरात शिवार उद्यान येथील नाट्यगृहाचे एकमेव आरक्षण पालिका आणि नगरसेवकांनी मिळून खाजगी विकासकाच्या घशात घातले आहे . त्यामुळे शहरात राहणाऱ्या नागरिकांना नाट्यगृह नसल्याने मुंबई - ठाण्याला जावे लागते . शहरात नाट्यगृह असावे यासाठी ठाकूर मॉल शेजारी सुविधा भूखंडावर नाट्यगृह उभारण्याची मागणी सरनाईक यांनी चालवली होती . त्याचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख असताना युती शासन काळात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते . टीडीआरच्या मोबदल्यात इमारत बांधली जात आहे . 

नाट्यगृहाचे बेसमेंट तळ अधिक चार मजला असे बांधकाम पूर्ण झाले आहे. येथे मुख्य नाट्यगृह १ हजार आसनांचे तर दुसरे छोटे नाट्यगृह हे ३०० आसनांचे आहे . नवोदित कलावंतांना सराव छोटे कार्यक्रम साठी लहान नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. इमारतीत तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर दोन आर्ट गॅलऱ्या असणार आहेत. 

या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी वेळी आ . सरनाईक व महापालिका आयुक्त दिलीप ढोले सह नगरसेवक राजू भोईर, धनेश पाटील, कमलेश भोईरनगरसेविका भावना भोईर, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे, उपअभियंता यतीन जाधव, अभियंता प्रफुल वानखेडे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हासंघटक.स्नेहल सावंत, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, परिवहन समिती सदस्य लक्ष्मन कांदळगावकर आदीच्या उपस्थितीत झाली.   

नाट्यगृहाचे आरसीसी काम पूर्ण झाले असून आता नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावट, साउंड सिस्टीम , आसन व्यवस्था व उर्वरित कामे केली जाणार आहेत. यावेळी बसण्याची खुर्ची कशी असेल ती दाखविण्यात आली. नाट्यगृहात नाट्यकर्मीना काय हवे आहेनाट्यगृहाची अंतर्गत सजावट कशी असावी व एकूणच नाट्यकर्मीना त्यात काय हवे यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकार दिग्दर्शक नेपथ्यकार यांची एक समिती आत्ताच बनवून त्यांच्या सूचना जाणून घाव्यात. पुढील वर्षी मार्चपर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल व या नाट्यगृहाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच व्हावे असा प्रयत्न राहील. 

नाट्यगृह इमारतवर सुमारे ८० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. अंतर्गत सजावटीचे कामही विकासकाकडूनच करून घेतले जाणार आहे. अंतर्गत सजावटीसाठी व पुढील कामांसाठी जवळपास ६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नाट्यगृहाची इमारत व अंतर्गत सजावट आदी सर्व कामे टीडीआरच्या मोबदल्यात करून घेतली जात असल्याने जवळपास १५० कोटींचा खर्च असलेला हा नाट्यगृह प्रकल्पसाठी महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही असे सरनाईक म्हणाले . 

Web Title: Work on Mira Bhayander's theater will be completed by March; Information of Shivsena MLA Pratap Saranaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.