उल्हासनगरात महिला जुगार अड्ड्यावर धाड, ४ महिलांसह ७ जणांना अटक, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: August 11, 2023 19:44 IST2023-08-11T19:42:33+5:302023-08-11T19:44:21+5:30

त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व १८ हजार ८७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Women's gambling den raided in Ulhasnagar, 7 persons including 4 women arrested, case registered | उल्हासनगरात महिला जुगार अड्ड्यावर धाड, ४ महिलांसह ७ जणांना अटक, गुन्हा दाखल

उल्हासनगरात महिला जुगार अड्ड्यावर धाड, ४ महिलांसह ७ जणांना अटक, गुन्हा दाखल

सदानंद नाईक 
उल्हासनगर :
कॅम्प नं-२, फक्कड मंडळी चौक परिसरातील महिला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन पत्ते जुगार घेलणाऱ्या ४ महिलांसह ७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व १८ हजार ८७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-२, राम मॉलिशवाल्याच्या दुकाना मागील एका घरात महिलांचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गुरवारी रात्री साडे ८ वाजता जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणारे नीरज सुनील धामेजा, अमित रेवानंद सौम्यजा, अनिल मोहनदास जामाई, सीमा भिवम शर्मा, प्रिया विक्रम दोधानी, डिंपल अजय दोधानी व अनुष्का संदीप गेरेजा आदी जनांना अटक करून गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्यासह १८ हजार ८७० रुपये रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

तसेच दुसऱ्या घटनेत कॅम्प नं-१, वाल्मिकी पाडा येथील सार्वजनिक शौचालय शेजारील मटका जुगार अड्ड्यावर गुरवारी सायंकाळी साडे सहा वाजता पोलिसांनी धाड टाकून गोपीनाथ भानुदास लांडगे, विजय मल्हारी निकम व सुनील खडगा मुनेजा अश्या तिघांना मटका जुगार खेळतांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करून अटक केली आहे.

Web Title: Women's gambling den raided in Ulhasnagar, 7 persons including 4 women arrested, case registered