Women's Day Special: दुर्गम शिखरे पादाक्रांत करणारी सह्याद्रीकन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 01:52 IST2020-03-08T01:52:00+5:302020-03-08T01:52:29+5:30

सह्याद्रीची अनेक शिखरे केली सर । माउंट एव्हरेस्ट पार करण्याची तयारी

Women's Day Special: Hiking Trails that Find the Hardest Peaks | Women's Day Special: दुर्गम शिखरे पादाक्रांत करणारी सह्याद्रीकन्या

Women's Day Special: दुर्गम शिखरे पादाक्रांत करणारी सह्याद्रीकन्या

हरिहर गर्जे 

पाथर्डी : ऊसतोड कामगारांची मुलगी अर्चना बारकू गडधे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत मोठ्या भावाच्या अपघाती मृत्यूचे दु:ख विसरून आणि आई-वडिलांचा मुलगा बनून सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक डोंगरकडे सर करण्याची किमया केली आहे़ आता ती माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करीत आहे.

जीवनातील संकटांना दुर्गम शिखरे समजून त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी अर्चनाने सह्याद्रीचे कडे सर करीत ट्रेकिंग करण्याचा मार्ग निवडला. आजपर्यंत वासिंद (जि. ठाणे) येथील ३ हजार फूट उंचीचा वजीर सुळका सलग ३ वेळा सर करीत विक्रम केला. रायगड किल्ल्याशेजारील समुद्र सपाटीपासून ३ हजार ५०० फूट उंचावर असलेला लिंगाणा अर्चनाने सहज सर केला. जीवधन किल्ल्याशेजारील ४५० फूट उंचीचे वानरलिंगी शिखरही तिने सर केले़ पुणे जिल्ह्यातील नानेघाटातील ३६० फूट उंचीचा नानाचा अंगठा, हरिहर किल्ल्याजवळील ४५० फूट उंचावरील स्कॉटीशकडा, मनमाड येथील १२० फुटांवरील हडबीची शेंडी, माकडनाळ वाटेने सलग १९ तासांची यशस्वी चढाई करीत हरिश्चंद्रगडही तिने सर केला आहे़ पॉइंट ब्रेक एडव्हेंचर ग्रुप, नाशिक यांच्या मदतीने महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा नवीन विक्रम स्थापित करण्यासाठी वजीर सुळका ती सर करीत आहे.

Web Title: Women's Day Special: Hiking Trails that Find the Hardest Peaks