पाणी मिळत नसल्याने भिवंडी पालिका मुख्यालयावर धडकल्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 19:52 IST2021-07-09T19:51:27+5:302021-07-09T19:52:06+5:30
Bhiwandi Water Supply : अनेक दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक झालेत त्रस्त.

पाणी मिळत नसल्याने भिवंडी पालिका मुख्यालयावर धडकल्या महिला
भिवंडी : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील फुलेनगर, मिलिंद नगर या भागात मागील चार महिन्यांपासून अनियमित व कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, या भागातील महिलांनी शुक्रवारी दुपारी अचानक पालिका मुख्यल्यावर जाब विचारण्यासाठी धडक दिली.
या प्रसंगी सुरक्षारक्षकांनी महिलांना प्रवेशद्वारावर अडविल्याने महिलांनी एकच गोंधळ घालत अधिकाऱ्यांना खाली बोलविण्याची मागणी केली. दरम्यान स्थानिक निजामपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर पालिका प्रवेशद्वारावर आलेल्या अधिकाऱ्यांनी सोमवारी परिसरात येऊन तेथील समस्या जाणून घेऊन सोडवणूक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलिसांनी महिलांची समजूत काढून त्यांना माघारी पाठविले.