शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विशेष लोकलसाठी महिला उतरल्या रुळांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 5:34 PM

भार्इंदर स्थानकातून अंधेरीसाठी सुरु झालेल्या नविन लोकल वरून शिवसेना व भाजपात श्रेयवाद रंगला आहे.

मीरारोड - आज गुरुवार १ नोव्हेंबर पासून भार्इंदर स्थानकातून अंधेरीसाठी सुरु झालेल्या नविन लोकल वरून शिवसेना व भाजपात श्रेयवाद रंगला आहे. दुसरीकडे भार्इंदरहून सुटणारी महिला विशेष लोकल मात्र विरारहून केल्याने संतप्त महिला प्रवाशांनी साखळी ओढली तसेच रुळावर उतरून आंदोलन केले.सकाळी ९.०६ ची भार्इंदर - चर्चगेट महिला स्पेशल लोकल आज पासुन भार्इंदर वरुन सोडणे बंद करुन ती लोकल विरार वरुन सोडण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त महिला प्रवाशांनी या निषेधार्थ सकाळी भार्इंदर स्थानकात आलेल्या लोकलची साखळी ओढली. तसेच रेल्वे रुळा वर उतरुन आंदोलन केले. महिला प्रवाशी रुळावर उतरल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. महिलांना बाजुला करण्यात आले. या घटनेने लोकल ५ मिनिटे थांबली होती.सकाळी गर्दीच्या वेळी सदर महिला विशेष गाडी भार्इंदर व मीरारोड मधील प्रवाशांसह महाविद्यालीयन विद्यार्थीनींना खुपच दिलासादायक होती. भार्इंदर मध्येच ही लोकल भरायची. पण विरार वरुन लोकल सोडल्याने महिला प्रवाशांना बसायला तर सोडा आत शिरायलापण कसरत करावी लागली. मीरारोडच्या महिला प्रवाशांचे सुध्दा हाल झाले. संतप्त महिलांनी भाजपा व सेनेच्या श्रेयवादासाठी जमलेल्यांना महिला लोकल रद्द केल्या बाबत जाब विचारला. महिला लोकल पुन्हा भार्इंदर स्थानकातुन सुरु करा अशी मागणी केली.दरम्यान भार्इंदर रेल्वे स्थानकातुन आज १ नोव्हेंबर पासुन सकाळी ८.५० वा. ची भार्इंदर - अंधेरी ही नविन लोकल सुरु करण्यात आली. या लोकल सुरु झाल्या बद्दल आज सकाळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला संघटक स्रेहल सावंत, उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, श्रेया साळवी, गटनेते हरिश्श्चंद्र आमगावकर, शहर प्रमुख प्रशांत पालांडे, लक्ष्मण जंगम, शहर संघटक विनया खेडसकर आदींनी भार्इंदर रेल्वे स्थानकात नव्याने सुरु झालेल्या ८.५० च्या भार्इंदर - अंधेरी लोकलला झेंडा दाखवला.तर भाजपाच्या महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. रवी व्यास, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, डॉ. सुशील अग्रवाल आदिंनी त्याच लोकलला झेंडा दाखवत प्रवाशांना लाडु वाटले. महापौर व उपनगरीय रेल उपयोगकर्ता समिती सदस्य यांनी लोकल सुरु करण्यासाठी मागणी केल्याचे व्यास, पाटील यांनी सांगीतले.रेल्वे यंत्रणा खासदारांशी संबंीधत असुन मीरा भार्इंदरकरांच्या सोयीसाठी ८.५० ची नविन लोकल, मीरारोड स्थानकात वातानुकुलीत लोकल ला थांबा देण्या करीता आपण सतत पत्रव्यव्हार व बैठकां मध्ये मागणी केल्याचे खा. विचारे यांनी म्हटले आहे. महिला स्पेशल लोकल पुन्हा भाईंदर मधुन सोडण्यासाठी रेल्वे प्रशासना कडे मागणी करणार आहे. सकाळी ५.२५ वा. ची बोरीवली वरुन विरारला जाणारी लोकल आज पासुन भार्इंदर वरुन सुटणार. सकाळी ६.१७ वा . ची बोरीवली वरुन येणारी भार्इंदर - चर्चगेट लोकल सुध्दा आज पासुन ६.१५ वा. भार्इंदर वरुन सुटल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरlocalलोकल