शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये महिलाच करतात महिलांचा छळ, त्रस्त महिलेचे ‘लोकमत’ला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:57 AM

दिवसेंदिवस रेल्वे प्रवास हा धोक्याचा होत असतानाच महिला प्रवासीच महिला सहप्रवाशांचा छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

डोंबिवली - दिवसेंदिवस रेल्वे प्रवास हा धोक्याचा होत असतानाच महिला प्रवासीच महिला सहप्रवाशांचा छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणच्या रहिवासी हर्षा चव्हाण यांनीच त्यांचा इंद्रायणी एक्स्प्रेसमधील महिला डबा मागतोय मोकळा श्वास, अशा आशयाचे पत्र ‘लोकमत’ला पाठवले आहे.  त्यात महिला प्रवाशांची सुटका करा आणि छळ मांडणाऱ्या महिलांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.चव्हाण म्हणाल्या की, इंद्रायणी एक्स्प्रेसमधून पुण्याहून ज्या महिला नित्याने प्रवास करतात, त्यापैकी काही प्रमाणात मी देखील त्या डब्यातूनच प्रवास करते. कधी कल्याण येथून प्रवास तर कधी मुंबई-पुणे या गाडीच्या परतीच्या प्रवासात मी त्या डब्यात असते. पण अनेकदा केवळ आसनव्यवस्थेसारख्या क्षुल्लक कारणावरून महिला एकमेकींचे केस उपटणे, चावा घेणे, मारहाण करणे, सतत टोमणे मारणे, मोठ्याने नाहक बोलणे, आवाज-गोंधळ घालणे, खोट्या तक्रारी करून दबाव आणणे, दहशत निर्माण करणे, सीटवर झोपून राहणे, महिला सहप्रवासी गरीब असेल तर विकृतपणे हसून खिल्ली उडवणे, असे नानाविध प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, महिला प्रवाशांची ही दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून आता सहन होत नाही. यासंदर्भात पुणे रेल्वे पोलिसांकडेही तक्रार दिली. मात्र, अद्याप तरी कोणतीही कारवाई झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.अरेरावी, अर्वाच्य भाषेमुळे नाराजीपास दाखवा अन्यथा हाकलून देऊ, अशी अरेरावी करत महिलांची टोळकी अन्य महिला सहप्रवाशांना टार्गेट करून अर्वाच्य भाषेत बोलतात. हे काही योग्य नाही. मी मासिक पासधारक असूनही अशा विकृत मानसिकतेची अनुभूती आल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे या अन्यायाला ‘लोकमत’ने वाचा फोडावी, असे त्या म्हणाल्या. जेणेकरून असे कृत्य करणाºया महिला प्रवाशांना चाप बसेल, तसेच कारवाई अथवा समुपदेशन झाल्यास गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक महिला आदींना न्याय मिळेल, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेWomenमहिला