धक्कादायक! महिलेची हत्या करून फेकले समुद्रात, भाईंदर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 18:37 IST2021-05-16T18:36:59+5:302021-05-16T18:37:33+5:30

एका महिलेची हत्या करून फेकलेला  तिचा मृतदेह हा भाईंदरच्या उत्तन येथील वेलंकनी तीर्थमंदिर जवळच्या समुद्र किनारी सापडला आहे . पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत महिलेची ओळख मात्र पटलेली नाही. 

woman was killed and thrown into the sea | धक्कादायक! महिलेची हत्या करून फेकले समुद्रात, भाईंदर येथील घटना

धक्कादायक! महिलेची हत्या करून फेकले समुद्रात, भाईंदर येथील घटना

मीरारोड - एका महिलेची हत्या करून फेकलेला  तिचा मृतदेह हा भाईंदरच्या उत्तन येथील वेलंकनी तीर्थमंदिर जवळच्या समुद्र किनारी सापडला आहे . पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत महिलेची ओळख मात्र पटलेली नाही. 

नगरसेविका शर्मिला गंडोली यांचे पती अजित यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात समुद्र किनारी एक फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह लागलेला असल्याची माहिती दिली . त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला असता मृतदेह सापडण्या आधी सुमारे ४८ तासांच्या पूर्वी तीचा मृत्यू झाल्याचे तसेच गेला आवळून केलेली हत्या असल्याचे उघडकीस आले . 

पोलिसांनी अनोळखी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे . परंतु महिलेची ओळख अजून पटलेली नाही . तिच्या उजव्या हातावर इंग्रजी मध्ये पोर्निमा ई बी यु असे गोंदलेले आहे . ५ फूट ४ इंच उंची आणि ३५ ते ४० वयोगटातील हि मयत महिला असून पोलिसांनी तिची ओळख पटावी म्हणून मुंबई - पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना सुद्धा माहिती पाठवली आहे असे पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी म्हणाले . 

 

 

Web Title: woman was killed and thrown into the sea