ठाण्यात विनयभंग करणाऱ्याला महिलेने दाखविला दुर्गेचा अवतार: नागरिकांच्या मदतीने दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 22:41 IST2020-10-22T22:37:32+5:302020-10-22T22:41:24+5:30
आपल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन जाणा-या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करुन मोटारसायकलीवरुन पळून जाणा-यास एका दक्ष नागरिकाने पाठलाग करुन पकडले. त्यानंतर या महिलेने अक्षरश: दुर्गेचा अवतार दाखवित त्याला चांगलाच चोप देऊन नंतर पोलिसांच्या हवाली केल्याची घटना गुरुवारी मानपाडा भागात घडली.

दक्ष नागरिकांनी पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मानपाडा येथे आपल्या पतीला डबा देण्यासाठी जाणाºया ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करणाºया संदेश मोडक (३८, रा. बाळकूम, ठाणे ) याला चितळसर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. पायी जाणाºया या महिलेचा विनयभंग केल्यानंतर एका दक्ष नागरिकाने बघितले. नंतर त्याचा पाठलाग करुन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मानपाडा येथील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटलमधील एका इमारतीमध्ये ही महिला वास्तव्याला आहे. जवळच असलेल्या एका खासगी इमारतीमध्ये तिचे पती सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला असल्याने ती २२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी पायी जात होती. त्याचवेळी तिथून मोटारसायकलवरुन जाणाºया संदेशने तिचा विनयभंग करुन तो पुढे निघून गेला. हा प्रकार त्याच भागातील एका दुकानाचे व्यवस्थापक चंद्रशेखर जनार्दन (३५) यांच्या निदर्शनास आला. त्या महिलेचा विनयभंग करणारी व्यक्ती तिच्या ओळखीची नसल्याची त्यांनी खात्री केली. तेंव्हा प्रसंसगावधान राखून त्यांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याचवेळी या महिलेनेही आपल्या पतीला या प्रकाराची माहिती दिली. तिच्या पतीसह जमलेल्या नागरिकांनी संदेशला चांगलाच प्रसाद दिला. त्यानंतर त्याला चितळसर पोलिसांच्या त्यांनी स्वाधीन केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सुरवाडे यांनी त्याला अटक केली. रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर यातील आरोपीला पाठलाग करुन पकडणाºया जनार्दन यांचे परिसरातून कौतुक होत आहे.