डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्याप्रकरणी कल्याणमध्ये निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 19:54 IST2019-12-01T19:54:44+5:302019-12-01T19:54:50+5:30

नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली.

Woman protests in Kalyan for murder after raping doctor girl | डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्याप्रकरणी कल्याणमध्ये निषेध

डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्याप्रकरणी कल्याणमध्ये निषेध

कल्याण: हैद्राबाद येथील डॉक्टर पीडितीवर बलात्कारनंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमधील जागरुक नागरीक आज सायंकाळी सात वाजता एकटावून पीडितीला आदरांजली वाहण्यात आली.

नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. यावेळी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. प्रत्येकाने हातात जळती मेणबत्ती  घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी शहरातील डॉ. संगीता गोडबोले यांनी पीडित तरुणीवर  लिहिलेली कविता जाहिरपणो वाचन करण्यात आली. या घटनेच्या निषेधासाठी सगळ्यांना हेपीन छाया यांनी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जागरुक नागरीक शिवाजी चौकात जमले होते.

Web Title: Woman protests in Kalyan for murder after raping doctor girl