खड्ड्यात दुचाकी घसरून महिला डॉक्टर जखमी, ठाण्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:25 IST2017-09-07T02:24:40+5:302017-09-07T02:25:01+5:30
खड्ड्यात दुचाकी घसरून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. शीतल नागरे या जखमी झाल्याची घटना ठाण्यातील तीनहातनाका येथे मंगळवारी सकाळी घडली.

खड्ड्यात दुचाकी घसरून महिला डॉक्टर जखमी, ठाण्यातील घटना
ठाणे : खड्ड्यात दुचाकी घसरून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. शीतल नागरे या जखमी झाल्याची घटना ठाण्यातील तीनहातनाका येथे मंगळवारी सकाळी घडली.
येथील सिग्नल लागण्यास काहीच सेकंद असल्याने बेस्ट बसचालकाने बस वेगात घेतली. त्या गोंधळात हा अपघात झाला असून सुदैवाने बसमागून गाड्या येत नसल्याने त्या बचावल्या आहेत. तसेच या वेळी तेथे तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप डॉ. नागरे यांनी केला आहे.
नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास डॉ. नागरे आपल्या दुचाकीवरून रु ग्णालयात जात होत्या. तीनहातनाक्यावरील सिग्नलवरून जाताना बेस्ट बसचालकाने सिग्नल लागण्यासाठी काही सेकंद असल्याने बस जोरात चालवली.
या वेळी बस अंगावर येत असल्याचे पाहून त्यांनी दुचाकी बाजूला घेतली. त्याच वेळी तेथील खड््ड्यात ती घसरून त्या खाली पडल्या. यामध्ये त्यांच्या हाताला आणि पायाला जखम झाली असून त्यांच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.