देवाची पूजा करताना साडी पेटल्याने महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 18:15 IST2023-02-27T18:15:06+5:302023-02-27T18:15:25+5:30
मीरारोड - घरात देवाची पूजा करताना दिव्यामुळे साडीचा पदर पेटून गंभीर भाजलेल्या २६ वर्षीय महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

देवाची पूजा करताना साडी पेटल्याने महिलेचा मृत्यू
मीरारोड - घरात देवाची पूजा करताना दिव्यामुळे साडीचा पदर पेटून गंभीर भाजलेल्या २६ वर्षीय महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भाईंदर पूर्वेच्या आर.एन.पी. पार्क येथील डायमंड कुशल इमारतीत प्रियंका दास ( २६ ) राहतात. नेहमी प्रमाणे त्या दुपारी घरात देवाची पूजाअर्चा करत होत्या. त्यावेळी साडीचा पदर दिव्याला लागून पेटला. साडीने पेट घेतल्याने प्रियांका गंभीर भाजल्या होत्या.
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांना उपचारादरम्यान मृत्यू झाला. आग्रीपाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासासाठी भाईंदरच्या नवघर पोलिसांना वर्ग केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.