उत्तन समुद्र किनारी बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह

By धीरज परब | Updated: June 2, 2023 17:53 IST2023-06-02T17:52:58+5:302023-06-02T17:53:22+5:30

तिच्या हातावर त्रिशूल व ओम चित्र असलेला टॅटू गोंदवलेला आहे. 

woman dead body was found in a bag on uttan beach | उत्तन समुद्र किनारी बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह

उत्तन समुद्र किनारी बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह

भाईंदर: भाईंदर पश्चिमेला उत्तन परिसरात उत्तन पातान बंदर येथे समुद्र किनाऱ्यावर एका बॅगेत महिलेचा शीर नसलेला मृतदेहाचे दोन तुकडे करून बॅगेत आढल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच उत्तन सागरी पोलीसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला. बॅगेत असणारा मृतदेह बिना शिराचा (मुंडी ) नसलेला फक्त धड असलेला २५ ते ३० वर्षीय वयोगटातील महिलेचा असून तिच्या शरीरावर मरून रंगाचा टी-शर्ट असून त्यावर बि-युअर सेल्फ असे नाव लिहलेले आहे. तिच्या हातावर त्रिशूल व ओम चित्र असलेला टॅटू गोंदवलेला आहे. 

तर मृतदेह असलेली बॅग पाण्यात वाहून आलेली असून नेमकी कुठून आली आहे याचा तपास पोलीस घेत आहेत. महिलेच्या हत्ये मागील कारण काय व हत्या कोणी व कुठे केली आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीस कसोटीने तपास करत असुन लवकरात लवकर हत्या करणाऱ्याचा शोध घेतला जाईल असे उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादाराम करांडे यांनी सांगितले आहे. कोणाच्या कुटुंबातील शरीरावर मरून रंगाचा शर्ट असलेली २५ ते ३० वर्षीय महिला मिसिंग असल्यास त्यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन देखील उत्तन सागरी पोलिसांच्या मार्फत करण्यात आले आहे.

Web Title: woman dead body was found in a bag on uttan beach