ठाण्यातील कचराळी तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 00:41 IST2020-10-20T00:38:13+5:302020-10-20T00:41:15+5:30

सुमारे एका ४० वर्षीय महिलेने कचराळी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या महिलेची अद्याप ओळख पटली नसून तिच्या कुटूंबियांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Woman commits suicide by jumping into 'Kachrali' pond in Thane | ठाण्यातील कचराळी तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

नातेवाईकांचा शोध सुरु

ठळक मुद्देनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नातेवाईकांचा शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून सोमवारी सुमारे एका ४० वर्षीय महिलेने कचराळी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या महिलेची अद्याप ओळख पटली नसून तिच्या कुटूंबियांचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील कचराळी तलावात एका अनोळखी महिलेने उडी घेतल्याचे त्याच परिसरातील एका सुरक्षा रक्षकाने पाहिले. परंतू, घटनास्थळ लांब असल्यामुळे तसेच त्याला पोहता येत नसल्यामुळे तो तिला वाचवू शकला नाही. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करुन या महिलेचा मृतदेह तलावातून काढण्यात आला. तिची ओळख पटली नसून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयात पाठविण्यात आला आहे. या महिलेबाबत माहिती असणाऱ्यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी केले आहे.

Web Title: Woman commits suicide by jumping into 'Kachrali' pond in Thane