शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

आध्यात्माशिवाय आपले आणि देशाचे भले होणार नाही - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 9:49 PM

देशाचे व आपले भले हे आध्यात्मा शिवाय होऊ शकत नाही. संतांचा उपदेश हा शासन यंत्रणेने व आपण सुध्दा ऐकला पाहिजे. संतांच्या मार्गदर्शना शिवाय काही होणार नाही. हळुहळु देशाची दिशा त्या मार्गावर वळत आहे.

मीरारोड - देशाचे व आपले भले हे आध्यात्माशिवाय होऊ शकत नाही. संतांचा उपदेश हा शासन यंत्रणेने व आपण सुध्दा ऐकला पाहिजे. संतांच्या मार्गदर्शना शिवाय काही होणार नाही. हळुहळु देशाची दिशा त्या मार्गावर वळत आहे. सर्वांनी मिळुन ती पुर्णपणे वळवावी लागेल. सर्वात आधी आपल्याला संतांच्या उपदेशांना आचरणात आणावे लागेल. शासन यंत्रणेचे पाऊल त्या दिशेने पडले आहे. आम्ही सुध्दा त्यासाठी प्रयत्न करत आहोत असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भार्इंदर येथे केले.भार्इंदरच्या बालाजी नगर येथे चातुर्मास साठी आलेले गच्छाधिपती आचार्य अभयदेवसुरीश्वरजी महाराज यांच्या दर्शनासाठी भागवत हे आले होते. यावेळी आचार्य मोक्षरत्न सुरीश्वरजी महाराज सुध्दा उपस्थित होते.आमच्या कार्यावर गुरदेव यांचे खुप स्रेह आणि आशिर्वाद आहेत. दरवर्षी असा योग जुळुन येतो आणि त्यांचा अशिर्वाद मिळतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहित. आपल्या देशाचे आणि आपले भले करायचे आहे तर आध्यात्माच्या आधारा शिावाय ती गोष्ट होऊ शकत नाही असे भागवत म्हणाले.आपण कितीही पैसा कमावला , कितीही साधन संपन्न झालो तरी जो पर्यंत आपल्या कडे सत्य व धर्म नाही तो पर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. जगात आणखी कोणी सुखी होत असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण जगात दुसरं कोणी सुखी झाल्याचे दिसत नाही.अर्थ व काम याची पुर्ति होऊन सुध्दा जग दुखी आहे. आपल्या कडे सत्य व धर्म असल्याने कमतरता असली तरी सुखी असणारे लोक आहेत. त्यामुळे देशाची निती असेल, किंवा माझ्या परिवाराचे चलन असेल किंवा माझा स्वत:चा स्वभाव असेल त्याला आधार हा सत्य व धर्माचा आहे.सत्यला निरंतर संपर्कात ठेऊन त्याच्या प्रकाशात स्वत: चालणारे व आपल्याला चालवणारे संत असतात. संतांच्या मार्गदर्शना शिवाय काही होणार नाही. आनंदाची गोष्ट ही आहे की , हळुहळु देशाची दिशा त्या मार्गा कडे वळत आहे. सर्वांनी मिळुन देशाला पुर्णपणे त्या मार्गावर वळवावे लागेल. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला संतांच्या उपदेशांना आचरणात आणावे लागेल.जिव हिंसा रोखण्याासाठी काही करणार असाल तर आपले जिवन आधी हिंसा मुक्त हवे.गाईसाठी काही करायचे तर गायचे संवर्धन व संरक्षण साठी काही करावे लागेल.कारण जे शासन तंत्र आहे तर पुर्णत: तसे बनलेले नाही. ते विपरीत गोष्टींसाठी बनले आहे. त्याला हळुहळु आपल्या सारखे करायचे आहे. शासन यंत्रणेत असणारयां पेक्षा त्याच्या बाहेर असतात त्यांचा दबाव वाढला तर तसे कार्य होते.संताचा उपदेश घेऊन, दिशा घेऊन जे शासन यंत्रणेत बसले आहेत ते त्यावर अमल करत आहेत. तो अमल हळुहळु होत आहे. संतांचा उपदेश शासन यंत्रणा व आपण पण ऐकला पाहिजे. सर्वच होत आहे असं नाही. आणि सर्व होईल असंही नाही. पण शासनाचे त्या दिशेने पाऊल पडले आहे.त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही पण करा. आज संतांशी चर्चा झाली असता त्यांचे मन कळले. आता त्या दिशेने आम्ही पुढे जाऊ असे भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ